तेजोमय स्वतंत्रवीर सावरकर (Tejomay Swatantryveer Savarkar)
प्रखर तेज, वाऱ्याशी स्पर्धा करणारा बुद्धीचा वेग, खडकासारखी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीनही शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता, ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करायची ते थोर पुरुष म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. Play In Audio या थोर देशभक्ताने आयुष्भर फक्त देशसेवाच केली. स्वताच घर अथवा संसार असा कधी केलाच नाही. आपल्या जीवन हयातीत बारा हजार (१२,०००) पानांचं साहित्य लिहून ठेवलं. इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठीत पर्यायी शब्द शोधला आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे वैभव वाढवले आणि भाषा समृद्ध केली. स्वातंत्र्यवीर सावरकर देशकार्यासाठी इंग्लंडमध्ये शिकत असताना, पुस्तकातून आपल्या क्रांतिवीरांना शस्त्र पाठवली. देशप्रेमासाठी भर समुद्रात उडी मारून सतत चार दिवस पोहत राहिले आणि पोहतान...