Posts

Showing posts from May, 2019

सावरकर : एक आधुनिक चाणक्य

Image
         सावरकर : एक आधुनिक चाणक्य           प्रखर तेज , वाऱ्याशी स्पर्धा करणारा बुद्धीचा वेग , खड्कासारखी कठोरता , प्रत्यक्ष बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्कराव इतकी बुद्धीची प्रगल्भता ,  ज्यांच्या घरात प्रत्यक्ष सरस्वती पाणी भरते ,  असे तेजस्वी व महान पुरुष जे आपल्या भारतभूमीवर उदयास आले ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर .        आजच्या या लेखाचे नाव ‘ सावरकर : एक आधुनिक चाणक्य ’ ठेवण्याचे कारण म्हणजे , या दोन्ही महापुरुषांमध्ये अनेक गोष्टींची असणारी साम्यता . त्यातील प्रमुख गोष्टी म्हणजे अनेक विषयांवर असणारे प्रावीण्य , दूरदृष्टी आणि विचारांची असणारी स्पष्टता .       ‘ सावरकर ’ हे दिसायला जरी पाच सरळ शब्द असले तरी या पाचच शब्दांमध्ये प्रचंड अशी उर्जा भरलेली आहे . विनायक दामोदर सावरकर हे नाव अनेक क्षेत्रांमध्ये नावाजलेल . कारण , सावरकर काय नव्हते ? ते उत्तम राजकारणी होते , स्वातंत्र्यसेनानी होते , भाषाशास्त्राचे गाढे अभ्यासक होते , धर्मज्ञानी होते , समाजसुधारक होते ,