Posts

Showing posts from June, 2020

Savarkar - Pune to London

                In the previous article , we focused on how Vinayak spent his childhood, how Vinayak turned to be a freedom fighter? What triggered his thoughts and actions to establish 'Mitra Mela' though he was a teenager? At that time and who inspired him for the same?                   Let's see what happens next. In 1901, Vinayak married a girl named Yamuna Chiplunkar in Nashik. Later he stayed in Nashik for a year and passed the matriculation examination. Now for further education, Savarkar left Nashik in 1902 and entered Fergusson College in Pune. Pune in 1902 was the center of Indian politics. Bal Gangadhar Tilak, also known as Lokmanya Tilak from Pune, who is one of the trios of Lal-Bal-Pal (Lala Lajpatrai-Bal Gangadhar Tilak-Bipinchandra Pal) who led the freedom struggle. Therefore, As an effect, the agony of the freedom struggle in Pune was quite different which proved to be perfect for Vinayak's urge of Indian freedom. Lokmanya Tilak, Shivrampant Paranj

सावरकर एक विचारधारा - भाग ३

                 मागील लेखात आपण पाहिले की विनायक दामोदर सावरकरांचे बालपण कुठे व कसे गेले ? छोट्या विनायक मध्ये मुळातच असलेला 'स्वातंत्र्यवीर' जागा होण्यासाठी नक्की कोणती घटना महत्त्वाची ठरली ? त्यातून त्यांनी पुढे जाऊन वयाच्या अवघ्या 16-17 व्या वर्षी 1 जानेवारी 1900 साली  ‘मित्रमेळा’ ही  गुप्त क्रांतिकारी संघटना नाशिक येथे कशी स्थापन केली ? त्याचे प्रेणस्थान काय होते ?                    आता आपण पुढील कथा पाहू,१९०१ साली नाशिकला विनायकाचा  यमुना चिपळूणकर या मुलीशी विवाह झाला. पुढे वर्षभर नाशिक मध्येच राहून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. आता पुढील शिक्षणासाठी  म्हणून १९०२ साली  सावरकरांनी नाशिक सोडले आणि ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. १९०२ च्या काळातील पुणे म्हणजे भारतीय राजकारणाचे केंद्र. स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करणाऱ्या लाल-बाल-पाल (लाला लजपतराय-बाळ गंगाधर टिळक-बिपीनचंद्र पाल) या त्रिकुटा पैकी बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक हे  पुण्याचेच. त्यामुळे पुण्यात स्वातंत्र्य लढ्याची ऊर्जा आणि हवा काही वेगळीच होती अगदी या विनायकाला हवी होती तशीच. त्य

The Story of The First Political Assassination By Chapekar Brothers

Image
(The Marathi version of this article is published in the newspaper named 'Taraun Bharat') Today, June 22 is a special day in the history of Indian freedom for independence. This is because exactly 123 years ago today, the banks of the River Thames were shaken and the whole of London has trembled. The reason was the incident that took place in Pune. The Chapekar brothers shot and killed a British officer named Walter Rand in Ganeshkhind, Pune. But if it was just a simple murder, it would not have gained so much importance. But it was the first political assassination in Indian history. No one had ever dared to attack a British official before. There was no personal motive in this and it was a serious result of the huge anger of the public.               You may be wondering what is the importance of this murder? There were many such incidents during India’s struggle for freedom, but the assassination was not just an incident but the beginning

चापेकर बंधूंची अजरामर कहाणी - गोष्ट भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या राजकीय हत्येची

Image
(माझा सदर लेख हा 'तरुण भारत' या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे.) आज २२ जून भारतीय स्वतंत्र लढ्यात या दिवसाला एक विशेष महत्व आहे. याचे कारण म्हणजे बरोबर १२३ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी थेम्स नदीच्या काठी थरकाप उडाला होता व  संपूर्ण लंडन हादरले होते. कारण होता पुण्यात मुठेतीरी घडलेला प्रसंग.  चापेकर बंधूंनी गणेशखिंडीमध्ये वॉल्टर रॅंड या ब्रिटिश अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. पण हा फक्त एक साधारण खून असता तर त्याला  इतके महत्व प्राप्त झाले नसते.  पण ती होती  भारतीय इतिहासातील पहिली राजकीय हत्या. या आधी कोणत्याच  ब्रिटिश अधिकाऱ्यावर असा हल्ला करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. यामध्ये कोणतेही व कोणाचाही वैयक्तिक हेतू नसून, प्रचंड जनक्षोभाचा तो एक गंभीर परिणाम होता.                 आपण विचार करत असाल की एका हत्येचे  एवढे काय ते महत्व ? स्वातंत्र्य लढ्याच्या काळात असे अजूनही प्रसंग घडलेच की, पण  ही हत्या फक्त एक घटना नव्हती तर ती एका नव्या सशस्त्र क्रांतीची सुरुवात होती. त्या क्रांतीमध्ये  चापेकर बंधूंनी ही जी क्रांतीची आग पेटवली होती ती  पुढ

Savarkar : The Journey Begins

  In marathi ‘Kar’ means hand and ‘Savar’ means to save...I think Sawarkar's name conveys the same thing..A hand which saves the nation..His life  is not less than any mysterious adventurous story. The story is full of awesome incidents and sometimes it makes us cry as well. You may feel the wave of inspiration passing through.         The important reason why Savarkar and his thoughts should be studied is because of the clarity, nobility, and extraordinary erudition in those thoughts. But the basic question in front of all of us is, why should we study these historical characters? Or their thoughts? And what is the use of this in the present day? Why waste our time to revisit all these personalities and thoughts? But we also find the answer to this in Savarkar's literature. Historical characters should be studied for natural gratitude. They should be remembered as a blessing to the world. It should be done because they are a source of inspiration to the you

सावरकर एक विचारधारा : भाग २

ज्याचा कर (हात )आपल्या पडत्या राष्ट्राला सावरतो तो ‘सावरकर’ आणि खऱ्या अर्थाने सावरकर हे नाव सार्थ करून दाखवणारे  एक व्यक्तिमत्व  म्हणजे विनायक दामोदर सावरकर. या व्यक्तीचे आयुष्य कोणत्याही गूढ आणि साहसी कथा कादंबरीपेक्षा वेगळे नाही. यातही पावला-पावलावर अनेक थक्क करणाऱ्या घटना आहेत. तर कधी डोळ्यातून अश्रू आणणारे प्रसंग आहेत. कधी साहस आहे. तर कधी अत्यंत प्रेरणा देउन जाणाऱ्या लहरी आहेत.                     वि.दा. सावरकर आणि  त्यांचे विचार समजावून घ्यावेत याचे महत्वाचे  कारण म्हणजे त्या विचारात असलेली स्पष्टता, उदात्तता आणि कमालीचे पांडित्य. पण आपल्या  सर्वांसमोरचा मूळचा प्रश्न हा की, या ऐतिहासिक पात्रांचा अथवा त्यांच्या विचारांचा अभ्यास आपण करावा तरी का? आणि त्याचा आत्ता वर्तमानकाळात आपल्याला उपयोग काय ? जे घडून गेले त्याचा हा उहापोह कशासाठी ? पण याचेही उत्तर आपल्याला सावरकरांच्या साहित्यात  सापडते.  मुळात ऐतिहासिक पात्रांचा अभ्यास हा निसर्गजन्य कृततज्ञतेसाठी करावा. त्यांनी जगावर जे उपकार केले आहेत त्याचे स्मरण म्हणून करावा. तरुणांना किंवा संपूर्ण समाजाला  प्रेरणा देणारे

Why should we know 'The Savarkar'?

Image
“Savarkar”, the name is enough to grab your attention. Now some people might be filled with respect, some with hatred and some with doubts. Isn’t it rare to find such extreme emotions about a freedom fighter and a politician? But the word “Savarkar” brings such emotions with him. In the history of Indian politics, he is probably the only one with such ambiguous controversies. Oh! He is labeled as a controversial personality by Indian media without even wanting to scrutinize him and understand him. In these articles, We will cover the topics “Who is Savarkar?” , “What Savarkar did?”, and most importantly ‘When did he change from “Just a Person” to “An Ideology” and how?         Twelve thousand (12,000) pages of literature written by Vinayak Damodar Savarkar and the exact number written by others on him cannot be stated, but several thousand pages of literature have been written on his philosophy. There are also famous poems lik

सावरकर : एक विचारधारा - भाग १

Image
‘सावरकर’ हे शब्द कानी पडले की बऱ्याच जणांचे कान टवकारले जातात. काहींचे शंकेने, काहींचे तिरस्काराने, तर काहींचे आदराने. ‘सावरकर’ म्हटले की काहीजण तर अगदी चवताळूनच उठतात. एकाच व्यक्तीमत्वाबद्दल इतक्या दोन टोकाच्या प्रतिक्रिया येणे तसे दुर्मिळच.                 पण ‘सावरकर’ या शब्दाबरोबर या प्रतिक्रिया येतातच. या इतक्या संमिश्र प्रतिक्रिया येणारे कदाचित भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि भारतीय राजकारणातील ही एकमेव व्यक्ती असावी.                 आपण बरेच वेळा याला काँट्रॅव्हेनशल (contraventional) असे label लावतो. पण अर्थातच आपण कधी त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करत नाही. खोलात सोडा पण आपण तो विषय किमान समजून घेणेही टाळतो. तर आपण या लेखमालेत नक्की ‘सावरकर’ म्हणजे कोण? ‘सावरकर’ या व्यक्तीने नक्की काय केले? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ‘सावरकर’ हा शब्द एका व्यक्तीमधून एक विचारधारा का, कधी व कसे बनला?                 ‘विनायक दामोदर सावरकर’ या नावाभोवती त्यांनी स्वतः लिहिलेले बारा हजार (१२,०००) पानांचे साहित्य व दुसऱ्यांनी त्यांच्यावर लिहिलेले अगदी नक्की आकडा सांगता येत नसला