Posts

Showing posts from June, 2015

अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस"

                   आज आपण २१व्या शतकात भौतिक सुविधांच्या दृष्टीकोनातून प्रगतीच्या शिखरावर वाटचाल करीत आहोत.पण,माणूसपणाच्या दृशिकोनातून मात्र आपला प्रवास उलटया दिशेने चालू आहे.                    खरच....माणूस म्हणजे कोण?असे म्हटले जाते की,परमेश्वराने सर्व प्राणी,पक्षी व इतर जीव निर्माण करून झाल्यानंतर त्याला आपल्यासारखेच काहीतरी निर्माण करावेसे वाटले व त्यातूनच त्याने माणसाची निर्मिती केली.पहा ना,इतर  प्राण्यांमध्ये आणि आपणात केवढा फरक आहे.म्हणूनच माणूस म्हणजे परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती.परंतु,आज माणसाने आपल्या कृतीतून प्रत्यक्ष निर्माण कर्त्यालाही लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे आणि त्यातूनच हा विषय निर्माण झाला ‘अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’                     फार फार वर्षापूर्वी माणूस हा जंगलातून इतर प्राणांसारखाच राह...

'मृत्युंजय'

Image
नाव-मृत्युंजय लेखक-शिवाजी सावंत पृष्ठ-७२८ विषय-कर्णाचे जीवन                                                        शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय ' या कादंबरीला अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त आहेत. या कादंबरीत महारथी,दानवीर,सूर्यपुत्र 'कर्ण' याची उत्तम,जगाला आदर्श अशी कथा वर्णन केली आहे.महाभारतामध्ये कर्ण हा दुर्योधनाच्या बाजूने राहिल्यामुळे अनेकांनी त्याला वाईटच ठरविला.पण,'शिवाजी सावंत' यांनी कर्ण हा खरा कोण होता.त्याची सत्यता 'मृत्युंजय' या कादंबरीत आपल्या उत्कृष्ठ लेखनशैलीतून जगासमोर ठेवली आहे.                             या कादंबरीमध्ये 'शिवाजी सावंत' यांनी प्रत्येक गोष्टीचे अगदी बारकाईने व उत्तम शब्दालंकारात वर्णन केले आहे.यात त्यांनी निसर्ग सौंदर्याचे अत्त्यंत सुंदर वर्णन केले आहे.'मृत्युंजय' हे पुस्तक वाचताना त्यातील प्रत्येक प्रसंग...