'मृत्युंजय'















नाव-मृत्युंजय
लेखक-शिवाजी सावंत
पृष्ठ-७२८
विषय-कर्णाचे जीवन














                                                       शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय' या कादंबरीला अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त आहेत. या कादंबरीत महारथी,दानवीर,सूर्यपुत्र 'कर्ण' याची उत्तम,जगाला आदर्श अशी कथा वर्णन केली आहे.महाभारतामध्ये कर्ण हा दुर्योधनाच्या बाजूने राहिल्यामुळे अनेकांनी त्याला वाईटच ठरविला.पण,'शिवाजी सावंत' यांनी कर्ण हा खरा कोण होता.त्याची सत्यता 'मृत्युंजय' या कादंबरीत आपल्या उत्कृष्ठ लेखनशैलीतून जगासमोर ठेवली आहे.
                            या कादंबरीमध्ये 'शिवाजी सावंत' यांनी प्रत्येक गोष्टीचे अगदी बारकाईने व उत्तम शब्दालंकारात वर्णन केले आहे.यात त्यांनी निसर्ग सौंदर्याचे अत्त्यंत सुंदर वर्णन केले आहे.'मृत्युंजय' हे पुस्तक वाचताना त्यातील प्रत्येक प्रसंग हा आपल्या डोळ्यांसमोर घडत असल्यासारखाच भासतो.ही कादंबरी वाचल्यानंतर खरोखरच कर्णाच्या जीवनाची ओढ लागते व खरच कर्णाच जीवन किती कठीण होत याची जाणीव होते.आपणही या कादंबरीतून शिकण्यासारखे खूप काही आहे.प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचावेच.अशा या उत्कृष्ठ कादंबरीचे आपल्या लेखनशैलीतून ज्ञानाचे भांडार खुले करणाऱ्या 'शिवाजी सावंत' यांना मनापासून धन्यवाद. 




   'मृत्युंजय' या कादंबरीतील मला आवडलेली काही वाक्ये-
                            (लेखक-शिवाजी सावंत)

  • जिथे वैभवाचा विलास असतो तिथे संयमाचा वास नसतो.
  • अाशा हीच जीवनाची सर्वात महान शक्ती आहे.
  • जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसाच्या बाजूनेच अखेर कौल देत असते.
  • जीवन ही मनाच्या असंख्य धाग्यांच्या वस्त्राची अशी एक गाठ आहे की जी ज्याची त्यांनीच सोडवायची असते.
  • आपत्तीत ही तत्वनिष्ठ राहतो,तोच खरा माणूस.
  • संस्कार म्हणजेच जीवन.
  • स्वार्थ म्हणजे स्वतःवरची श्रद्धा नव्हे.
  • निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नये.
  • विकास आणि वाढ हीच जीवनाची लक्षणे आहेत.
  • सूड आणि प्रतिशोध या हलक्या मनाच्या क्षुद्र कल्पना आहेत.
  • माता म्हणजे ममतेच्या महन्मंगल मंदिरांनी गजबजलेलं तीर्थस्थान.
  • स्वभाव म्हणजे कुणालाही कधीही बदलता येईल असा घोडा थोडाच आहे.
  • मृत्युच्या महाद्वारातसुध्दा ज्या श्रद्धेला तडा जात नाही, तीच खरी श्रद्धा.
  • माणसाला मिळालेला  सर्वात मोठा शाप म्हणजे स्वार्थ.
  • दिनरात्र भोजन,निद्रा,धन,प्रेम यांसाठी धावणे म्हणजे जीवन नव्हे.
  • मोहाचे पाश निश्चयाच्या बळकट हातांनी कधीतरी तोडावेच लागतात.
  • जीवन हे योगयोगापेक्षा कर्तुत्वावर अवलंबून असते.
  • सहनशीलता सद्गुण असेलही पण लाचार स्तब्धता दुर्गुण नाही काय?
  • सामर्थ्याचा अर्थच मुळी दुर्बलांच्या हक्कांचे संरक्षण हा आहे.
  • मातृश्रद्धा हाच स्वर्ग तेच मुक्तीस्थान,मातृऋण हेच सर्वश्रेष्ठ ऋण. 
  • जीवन हे जन्म-मृत्यूच्या तासातून वाहणारी नदी आहे.
  • जे भंग पावत ते तेज नसत.
  • सत्य हे कधी-कधी कल्पनेपेक्षा भयानक असत.
  • ज्या समाजात आणि राष्ट्रात स्त्रीत्व लज्जित होत तो समाज आणि ते राष्ट्र विनाशाच्या गर्तेच्या काठावर आपसूक जाऊ शकत.
  • सत्य हे पाहणारांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इछेचा विचार कधीच करत नसत.ते नेहमीच जसं असत तसं समोर येत.उगवत्या सूर्यासारख.
  • अश्रू हे दुबळ्या मनाचे प्रतीक आहे.

                                     धन्यवाद





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर एक विचारधारा भाग 9

सावरकर एक विचारधारा - भाग ५

Part 11 -Savarkar : The Conclusion