अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस"


                  आज आपण २१व्या शतकात भौतिक सुविधांच्या दृष्टीकोनातून प्रगतीच्या शिखरावर वाटचाल करीत आहोत.पण,माणूसपणाच्या दृशिकोनातून मात्र आपला प्रवास उलटया दिशेने चालू आहे.
                   खरच....माणूस म्हणजे कोण?असे म्हटले जाते की,परमेश्वराने सर्व प्राणी,पक्षी व इतर जीव निर्माण करून झाल्यानंतर त्याला आपल्यासारखेच काहीतरी निर्माण करावेसे वाटले व त्यातूनच त्याने माणसाची निर्मिती केली.पहा ना,इतर  प्राण्यांमध्ये आणि आपणात केवढा फरक आहे.म्हणूनच माणूस म्हणजे परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती.परंतु,आज माणसाने आपल्या कृतीतून प्रत्यक्ष निर्माण कर्त्यालाही लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे आणि त्यातूनच हा विषय निर्माण झाला ‘अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’
                    फार फार वर्षापूर्वी माणूस हा जंगलातून इतर प्राणांसारखाच राहत होता.परंतु,परमेश्वराने दिलेल्या बुद्धीच्या वरदानातून व स्वकष्टातून त्याने हळूहळू प्रगतीला सुरवात केली व स्वतंत्र राहण्यापेक्षा एकीने राहणे,मिळून राहणे जास्त फायद्याचे आहे हे त्याला समजल्याने तो समूहाने राहू लागला व समाजाची निर्मिती झाली.माणसा-माणसांनी मिळून समाज घडतो.त्यात सर्वांचेच कल्याण असते.परंतु,कधी-कधी अहंकारापोटी याच माणसातील मूळ प्राणी जागृत होतो व त्याचे राग,मद-मत्सर,लोभ आदी समाज विघातक गुणात रुपांतर होते व त्यातूनच जातीय दंगली,मारामाऱ्या,चोऱ्या घडतात.
                     काळाच्या ओघात माणूस वसाहती,त्यातून गावे, नगरे व शहरे अश्या प्रगतीच्या टप्याने विकास करू लागला.आपण आज खूप प्रगती केली असली तरी शांत,सुखी व आनंदी समाज व माणूस मात्र घडवू शकलो नाही.आजकाल समाजामध्ये अस्थिरता,असमाधान,असंतुष्टांता,अविचार यांचे सम्राज पसरलेले आपण पाहत आहोत.त्यातूनच अनेक अत्याचार होतात,बलात्कार होतात,समाजसेवकांच्या हत्या होतात,जातीय दंगली होतात.व्यापारी अन्नधन्याची भेसळ व काळाबाजार करून लोकांना लुटत आहेत.तर ज्यांच्या हाती लोकसेवेची कामे द्यावीत ते भ्रष्टाचार करून आपल्या संपत्ती वाढवण्याच्या मागे लागले आहेत.स्वतःस संत-साधू म्हणवून घेणारे नराधम समाजाची फसवणूक करत आहेत.अरे काय चालेले हे कुठे गेले आपले ते माणूसपण आणि ति माणुसकी?
                       पूर्वी “ विद्वान सर्वत्र पूज्यते” असे म्हटले जायचे.पण आज ‘धनवान व सत्तावन सर्वत्र पूज्यते’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जेव्हा समाजाची ज्ञान लालसा,कष्ट करण्याची वृत्ती संपून फक्त धन लालसा व सत्तापिपासू वृत्ती निर्माण झाल्या तेव्हाच माणसातील माणूसपण सुध्दा  संपायला सुरुवात झाली.अब्राहम लिंकन यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, ‘दुष्ट माणसच्या दुष्टकृत्यांची फळे ही नेहमी सज्जन माणसांनाच भोगावी लागतात’ आणि आज आपण हेच अनुभवत आहोत.
                       असे जरी असले तरी अगदी निराश होण्याचे कारण नाही.कारण,शेवटी आपण माणूस आहोत.विचार आणि बुद्धी ही आपली शस्त्रे आहेत.हिंदवी स्वराज्याचे संध्यापक छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद,स्वातंत्र्यवीर सावरकर,लोकमान्य टिळक,ज्ञानेश्वर,फुले यांसारख्यानचे आदर्श आपल्या समोर आहेत.जर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर गरज आहे ती प्रत्येक स्त्रीने जिजाऊ,झाशीची राणी बनण्याची तर प्रत्येक मुलाने सानेगुरुजींचा श्याम,सावरकर,टिळक,शिवाजी बनण्याची.
                                              आज आपल्याला आपण माणूस आहोत या जाणिवेचा विसर पडला असून,जेव्हा ही जाणीव होते तेव्हाच दुसऱ्यातील माणूस आपल्याला समजू शकतो.आज माणूसपणाची जाणीव समाजाला करून द्यावी लागते ही दुर्देवाची गोष्ट आहे.एकमेकांचा व्देष,मत्सर व जीवघेणी स्पर्धा करणे थांबविले पाहिजे तरच माणूस आणि पर्यायाने जग सुखी होयील.
                    समाजात जितकी जास्त विषमता तेवढा समाज जास्त दुभंगलेला.प्रथम समाजातील विषमता दूर केली पाहिजे.समाजात विकासाचा समतोल निर्माण केला पाहिजे.
                   म्हणूनच आज आपण पुन्हा एकदा अद्वैततत्वज्ञानाकाडेगेले पाहिजे. अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा,मला ज्यामुळे दुख होते ती गोष्ट मी दुसऱ्याच्या बाबतीत करणार नाही.मला ज्यागोष्टीमुळे सुख,आनंद प्राप्त होईल अशी गोष्ट मी दुसऱ्याला मिळावी म्हणून प्रयत्न करेन.अशी धारणा जर प्रत्येकाने तर खऱ्या अर्थाने भौतिक व सामाजिक विकास होईल आणि हा शोध हा आपण स्वतःपासून सुरु करायला हवा.कारण,शेवटी आपल्यावर अस म्हणण्याची वेळ येऊ नये की, ‘कोण होतास तू,काय झालास तू.’
                   मी तर नक्कीच अशावादी आहे की माणसातील माणुसकी,त्याच्यातला खरा माणूस नक्की जागा होईल व संपूर्ण समाज हा चांगल्या माणसांचाच बनलेला असेल.अर्थात माणूस हा कधीच वाईट नसतो त्याची परिस्थिती किंवा प्रवृत्ती त्याला कारणीभूत असते.परिस्थिती आपल्या हातात नाही पण प्रवृत्ती आहे.आपण असे म्हणू की,संपूर्ण समाज हा चांगल्या  प्रवृत्तीच्या माणसांचाच असेल.म्हणून शेवटी एक कोठेतरी वाचलेली कविता म्हणविसी वाटते,

पोट प्रपंच करतात सारेच
स्वतःसाठी जगतात सारेच,
दुसऱ्यांसाठी जगणारा
दुखीतांना तारणारा
माणूस मी शोधतो आहे
माणूस मी शोधतो आहे




धन्यवाद


Comments

  1. Bold and beautiful!...Keep going Aporva!.you are on a perfect track.तुझे संस्कार पाहुन तुझं व तुझ्या पालकांचं मनापासुन अभिनंदन!अशी पिढी तयार झाली तर पहाता पहाता सर्व ऊणिवा भरुन निघतील व सावरकर व लोकमान्यांना अभिप्रेत असलेलादेश लवकरच साकार होईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर एक विचारधारा भाग 9

सावरकर एक विचारधारा - भाग ५

Part 11 -Savarkar : The Conclusion