सावरकर एक विचारधारा : समारोप अर्थात भाग 11

          


        ‘सावरकर एक विचारधारा’ ही दहा लेखांची मालिका आपण पहिली. परंतु यामुळे समग्र सावरकर कळतीलच हे म्हणणे योग्य ठरणार नाही व माझा वैयक्तिक तसा दावा देखील नाही. परंतु किमान ‘सावरकर’ या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक ओझरती ओळख होणे किंवा ह्या त्यांच्या कथांच्या व साहसी विचारांच्या वाचनामुळे एखाद्याला जरी त्यांचे चरित्र संपूर्णपणे अभ्यासण्याची किंवा वाचण्याची इच्छा झाली तरी या लेखमालेचा उद्देश खरोखरच सार्थ होईल. अखेर ‘सावरकर’ या व्यक्तिमत्वाविषयी वाचताना/ऐकताना कोणताही पूर्वग्रह दूषित चष्मा लावून न पाहता आपण जर या विचारधारेचा अभ्यास केला. तर अभ्यासाअंती अत्यंत क्रांतिकारी आणि पुढारलेले,लोकशाहीवादी, समाजसुधारक, तत्वज्ञ आणि थोर साहित्यिक असेच व्यक्तिमत्व आपल्याला सापडेल ही खात्री आहे.

          मुळात विनायक दामोदर सावरकर ही एक अशी व्यक्ती होती, जिच्या स्पर्शाने फक्त सोने नाही तर ती व्यक्ती किंवा वस्तू स्वतःच परीस होत असे. जे लोक त्यांच्या संपर्कात आले ते तेजाने उजळून निघाले. जेंव्हा गांधीजी रत्नागिरीला सावरकरांना भेटायला आले होते तेंव्हा ते सावरकरांच्या पत्नीला म्हणाले, ‘ तुम्ही कसे काय या माणसाचे हे तेज आयुष्यभर सहन करता कोण जाणे? मी थोडाच वेळ या तेजाच्या संपर्कात आलो तर मीही दिपून गेलो.'

अखेर यावरूनच मला आमच्या प्रोफेसर डॉ. अंजली देशपांडे यांच्या ‘कारागृह’ या कवितेच्या काही ओळी आठवतात,

'कारा न राहिली कारा, मंदिर तिचे जाहले,

स्पर्शाने विनायकाच्या, देवत्व कोठीला आले,

काळे न राहिले पाणी, जणु अमृत त्याचे झाले,

पुण्याचा प्रभाव कैसा, तीर्थक्षेत्र जन्मा आले.'

('कारागृह' ही मूळ कविता वाचण्यासाठी येथे click करा.)


              या लेखमालेला आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलात. त्याचबरोबर या लेखमालेच्या इंग्रजी लेखांसाठी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल मी शर्वरी ताथवडेकर यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून केलेल्या या सहकार्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्याबरोबरच या सर्व लेखांसाठी अत्यंत सुंदर अशी चित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझा मित्र दर्शन राठी याचा देखील आभारी आहे. लेखांच्या Proof Reading आणि एकूणच सहकार्याबद्दल मी माझे आई-वडील आणि आजोबा यांचा देखील ऋणी आहे.

तसेच या लेखमालेमध्ये वापरलेल्या सर्व संदर्भ ग्रंथांची सूची व आत्तापर्यंत झालेल्या १० ही लेखांच्या links खाली देत आहे. कोणाला अभ्यासासाठी किंवा ‘सावरकर’ अजून जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी हे ग्रंथ मुळातून वाचणे अत्यंत उपयुक्त ठरेल :

  • माझी जन्म ठेप - वि. दा. सावरकर

  • सावरकर - वि .स. वाळिंबे

  • सत्तावन्न ते सत्तेचाळीस - वि .स. वाळिंबे

  • स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव - अक्षय जोग

  • विविध लेख - वि. दा. सावरकर

  • समग्र सावरकर वाङ्मय - शं.रा. दाते

  • स्वातंत्र्यवीर सावरकर - चावट कि वात्रट? - डॉ.प.वि. वर्तक

  • दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ

  • १८५७ चे स्वतंत्रसमर - वि. दा. सावरकर

  • शत्रूच्या गोटामध्ये - वि. दा. सावरकर

  • Savarkar - Vikram Sampath

  • Supreme Court of India Judgement 2017/15103 (PIL No.32 of 2016)

सर्व लेखांच्या Links खाली देत आहे :


- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी



Comments

Popular posts from this blog

सावरकर : एक विचारधारा - भाग १

चापेकर बंधूंची अजरामर कहाणी - गोष्ट भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या राजकीय हत्येची

सावरकर एक विचारधारा : भाग २