सावरकर : एक आधुनिक चाणक्य

   

    सावरकर : एक आधुनिक चाणक्य

         प्रखर तेज, वाऱ्याशी स्पर्धा करणारा बुद्धीचा वेग, खड्कासारखी कठोरता, प्रत्यक्ष बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्कराव इतकी बुद्धीची प्रगल्भताज्यांच्या घरात प्रत्यक्ष सरस्वती पाणी भरतेअसे तेजस्वी महान पुरुष जे आपल्या भारतभूमीवर उदयास आले ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
       आजच्या या लेखाचे नावसावरकर : एक आधुनिक चाणक्यठेवण्याचे कारण म्हणजे, या दोन्ही महापुरुषांमध्ये अनेक गोष्टींची असणारी साम्यता. त्यातील प्रमुख गोष्टी म्हणजे अनेक विषयांवर असणारे प्रावीण्य, दूरदृष्टी आणि विचारांची असणारी स्पष्टता.
      ‘ सावरकरहे दिसायला जरी पाच सरळ शब्द असले तरी या पाचच शब्दांमध्ये प्रचंड अशी उर्जा भरलेली आहे. विनायक दामोदर सावरकर हे नाव अनेक क्षेत्रांमध्ये नावाजलेल. कारण, सावरकर काय नव्हते ? ते उत्तम राजकारणी होते, स्वातंत्र्यसेनानी होते, भाषाशास्त्राचे गाढे अभ्यासक होते, धर्मज्ञानी होते, समाजसुधारक होते, कवी होते, नाटककार होते आणि लेखक देखील होते. त्यामुळे संपूर्ण सावरकर समजायला आपल्या सारख्यांचे कित्येक जन्म देखील कमी पडतील.
           सावरकर नेहमी म्हणत असायचे की, “ माझे विचार लोकांना ४०-५० वर्षांनी पटतात आणि तोपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे.”  आणि आज आपण सगळेच या वाक्याची सत्यता अनुभवत आहोत. जशी चाणक्याची दूरदृष्टी अमलांत आणल्यामुळे चंद्रगुप्त सम्राट झाला. जशी दूरदृष्टी चाणक्याची होती तशीच दूरदृष्टी सावरकरांची देखील होती. पण, दुर्दैवाने आपण सावरकरांची दूरदृष्टी समजून घ्यायला कमी पडलो. सावरकरांची दूरदृष्टी आपण त्याच वेळेस अमलात आणली असती तर कदाचित आजचा भारत काही वेगळा असला असता.
                      सावरकरांनी देश महासत्ता होण्यासाठीची पहिली पाऊले म्हणून १९४७ सालीच तीन  () सूचना केल्या होत्या :-

      भारत देशाच्या सीमा निश्चित करून घ्या.
      भारताला अण्वस्त्रधारी म्हणजे Nuclear State बनवा.
      समाजातील शिक्षक आणि संरक्षक दल हे दोन घटक समृद्ध करा.
                           त्यावेळी आपण सावरकरांच्या या सूचनांकडे गांभीर्याने पहिल्याने आज आपण त्याची जबरदस्त किंमत मोजतो आहोत. आजही आपला पाकिस्तान आणि चीनशी सीमावाद चालूच आहे. आज आपण करोडो रुपये या सीमांच्या संरक्षणासाठी खर्च करतो कित्येक वीर जवान गमावून बसतो. तसेच भारताला NPT वर सही करण्यासाठी किती खटाटोप करावा लागला हे आपण जाणतोच. तसेच आजही आपल्याकडे आज शिक्षक आणि संरक्षक दल हे  दोन समाज जडण-घडणीचे पायाभूत घटक दुर्लक्षित झाले आहेत.
                  सावरकरांच्या दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार होते. त्याचवेळेस सावरकरांनी आंबेडकरांना सांगितले होते की, “धर्मांतर हा तूमच्या समस्येवरचा उपाय नाही. त्याने फक्त label बदलेल. आपल्याला समाजाचा दृष्टीकोन  बदलायला हवा.” आणि आज सद्य परिस्थिती काय आहे हे आपण सर्वच जाणतो.
                 जशी चाणक्याच्या विचारांमध्ये विचारांची स्पष्टता होती. जे काही करायचे ते अखंड हिंदुस्तानासाठीचतसेच सावरकरांचे विचार देखील अत्यंत स्पष्ट होते. सावरकरांनी इंग्लंडला जायचा मनसुबा बनवला तो ही कशासाठी तर, जसे शिवाजी महाराज दिल्लीला शत्रूच्या शिबिरात जावून शत्रू समजून आले. तसेच आपणही इंग्लंडला जावे. तिथे बॉंब विद्या शिकावी हा स्पष्ट विचार घेवूनच ते इंग्लंडला गेले. जेव्हा सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. तेव्हा त्यांना घेवून जाणारा पोलीस अधिकारी त्यांना सतत , ‘ हा बघा या बॅरिस्टरांचा बंगला हा त्या बॅरिस्टरांचा बंगला असे दाखवत होता म्हणाला , “ हे असले उद्योग करत बसला नसतात तर आज तुम्ही देखील अश्याच एख्याद्या अलिशान बंगल्यात राहिला असतात”. त्यावर सावरकर लगेच त्या अधिकाऱ्याला म्हणाले, “ मी देखील बॅरिस्टरीच करतो आहे फक्त मी देशाचा खटला चालवायला घेतला आहे.”
                    ह्यावरून आपल्याला सावरकरांच्या विचारातली स्पष्टता दिसून येते. जे अखंड भारताचे स्वप्न चाणक्याने पहिले तेच सावरकरांनीही पहिले. स्वातंत्र्य हे भीक मागून नाही तर रक्त सांडूनच मिळवायचे असते. कारण, विना रक्त सांडता मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहत नाही. याच विचारांचे होते हे दोन्ही महापुरुष चाणाक्य आणि सावरकर.
                                  सावरकर नेहमी म्हणत, :
      अहिंसा ही मुळात निसर्गाच्याच विरोधात आहे. कारण, इथे तर मोठा मासा देखील लहान मास्याला खावून जगतो.”
      हिंस्त्र श्वापदांची नखं आणि दात आम्हाला काढावेच लागतात. तेवढी अहिंसा आम्हाला मान्य आहे. ”
      जर वाघासमोर पंडित मोदक घेवून गेला तर वाघाचा पंडितच मोदक होतो. ”
                                                     ह्याच विचारांनी चाणक्याने तलवारीच्या बळावरचं जुलमी धनानंदाला धडा शिकवला होता. कारण, देशाच्या सीमा या तलवारीच्या टोकावरचं आखायच्या असतात याच विचारांची होती ही मंडळी.
                                                     सावरकरांना जेव्हा अंदमानच्या शिक्षेत  अनेक कष्ट सोसावे लागत. त्यांना घाण्याला जुंपले जाई. त्यांच्याकडून बेशुद्ध होईपर्यंत काम करून घेतले जाई. पण, अश्यातही सावरकर भितींवर कविता लिहित अश्यातूनचकमला' सारख्या महाकाव्याचा जन्म झाला. या त्यांच्या धैर्याला  सावरकरांनीच लिहिलेल्या एका कवितेच्या ओळी अगदी सार्थ ठरतात,
                                                अट्टहास करित जाई धर्मधारणी
                                                मृत्युसीच गाठ घालू मी घुसे रणी
                                           अग्नि जाळी मजसी ना खड्ग छेदितो
                                                भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
                                                   कधी कधी प्रश्न पडतो की, इतके अन्याय कष्ट सोसणारा माणूस जेव्हा ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसला असता मातृभूमीच्या प्रेमाने इतका व्याकूळ होतो की म्हणतो :
                                     
                                               ने मजसी ने परत मातृभूमीला |
                                               सागर प्राण तळमळला ||
                             एका कणखर माणसाची ही हळवी बाजू पहिली की खूप आश्चर्य वाटते.

                            असे हे थोर विनायक दामोदर सावरकर मला एक आधुनिक चाणक्याच वाटतात. या थोर माणसाने आपल्याला खूप काही दिले. सावरकरांनी मराठी भाषेला पुनुरुजीवन दिले. अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिले.अश्या या थोर पुरुषाला माझा शतशः प्रणाम. आज त्यांच्या जयंती निम्मित्त त्यांना अर्पण केलेला हा एक छोटासा लेख.

 
Apoorv S. Kulkarni                                                   

T.E. Electronics Engineering,

Vidyalankar Institute Of Technology,

Mumbai.



Comments

  1. Excellent Apoorv
    keep (it up) writing

    ReplyDelete
  2. सावरकरांना तरुण पिढी कडून हेच अभिप्रेत होतं.म्हणूनच तुझ्यासारखी विचार करायला लावणारी पिढी लवकरच तयार होईल असं वाटतय.ही विचारांची मशाल अशीच तेवत ठेव.तुझ्यासोबत एक संघटना ऊभी राहिल. सावरकरांचे आशिर्वाद तुम्हा अशा विचारवंता सोबत कायम असतील!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर : एक विचारधारा - भाग १

चापेकर बंधूंची अजरामर कहाणी - गोष्ट भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या राजकीय हत्येची

सावरकर एक विचारधारा : भाग २