सावरकर : एक आधुनिक चाणक्य
 
                 सावरकर  : एक  आधुनिक  चाणक्य               प्रखर  तेज , वाऱ्याशी  स्पर्धा  करणारा  बुद्धीचा  वेग , खड्कासारखी  कठोरता , प्रत्यक्ष  बृहस्पतीनेही  शिष्यत्व  पत्कराव  इतकी  बुद्धीची  प्रगल्भता ,  ज्यांच्या  घरात  प्रत्यक्ष  सरस्वती  पाणी  भरते ,  असे  तेजस्वी  व  महान  पुरुष  जे  आपल्या  भारतभूमीवर  उदयास  आले  ते  म्हणजे  स्वातंत्र्यवीर  विनायक  दामोदर  सावरकर .          आजच्या  या  लेखाचे  नाव  ‘ सावरकर  : एक  आधुनिक  चाणक्य ’ ठेवण्याचे  कारण  म्हणजे , या  दोन्ही  महापुरुषांमध्ये  अनेक  गोष्टींची  असणारी  साम्यता . त्यातील  प्रमुख  गोष्टी  म्हणजे  अनेक  विषयांवर  असणारे  प्रावीण्य , दूरदृष्टी  आणि  विचारांची  असणारी  स्पष्टता .         ‘ सावरकर  ’ हे  दिसायला  जरी  पाच  सरळ  शब्द  असले  तरी  या  पाचच  शब्दांमध्ये  प्रचंड  अशी  उर्जा  भरलेली  आहे . विनायक  दामोदर  सावरकर  हे  नाव  अनेक  क्षेत्रांमध्ये  नावाजलेल . कारण , सावरकर  काय  नव्हते  ? ते  उत्तम  राजका...