'माफ करा टिळक...'

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
                                   
           

                                                   Play In Audio




  
      
                  टिळक तुम्हाला साष्टांग नमस्कार.तुमचे चरित्र वाचले,तुमच्या आयुष्यावरचा चित्रपट पहिला.तुमचे जीवन जाणून घेताना आपणही तुमच्यासारखेच उत्कृष्ठ आणि सार्थकी लागेल असं आयुष्य जगावस वाटल.तुमच्या जीवनक्रमातील प्रत्येक प्रसंगाने अंगातल रक्त उसळत होत.शरीराचा कणनकण तुमच्या विषयीच्या आदराने तुमच्या चरणी झुकत होता.टिळक तुमच्या एक टक्का जरी आयुष्य जगले तरी ते सार्थकी लागेल.टिळक तुम्ही धन्य आहात.
               तुम्ही तुमच संपूर्ण आयुष्य देशहितासाठी खर्च केलत.प्रत्येक वेळेस विचार देशाच,मातृभूमीचाच केलात.देशासाठी आयुष्यभर कारावासात राहण्याचीही तयारी दाखवलीत.जरी,जामिनाची फारशी सोय नव्हती तरीही.नाहीतर आजकाल कारावासाची गुन्हेगारांना भीतीच उरली नाही.मग एखाद्याचा खून करा नाहीतर रस्त्यावरच्या गरिबांच्या अंगावर नशेत गाडी घाला.तासा-दोन तासात जामीन आहेच आणि टिळक आजकाल कारावासात तुमच्यावेळेसारखं नीच प्रतीच जेवण नाहीतर,बिर्याणी मिळते.त्यामुळे त्यांची फारशी अडचण नाही होत.
               लोकमान्य तुम्ही म्हणालात, ‘कितीही संकट आली आभाळजरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेऊन उभा राहीन मी.तुम्ही आभाळाएवढ्या संकटांवर पाय ठेऊन उभारलात.पण,आजकाल बहुतांश लोक टाचणीएवढ्या संकटावरही पाय ठेऊन उभे न राहत,त्याला डोक्यावर घेऊन आपल्याच जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न करतात.तेव्हा त्यावर पाय ठेवायची तयारी कोणाचीच दिसत नाही.
                टिळक तुमच स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.हे वाक्य सर्वांचेच तोंडपाठ आहे.पण,तुम्ही दिलेली स्वराज्याची हाक फार कमी जणांच्या कानात पोहचते.सर्वांना स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क माहित आहे.पण, ‘तो मी मिळवणारच मागचे कष्ट कोणी लक्षात घेत नाहीत.कारण,फक्त स्वार्थासाठी सोडून देशासाठी कष्ट करायचे असतात,देशासाठी बलिदान द्यायची असतात हा विचारच हल्लीच्या updated system मधून outdated झाला आहे.कारण,स्वतंत्र्याच्या कष्टाची झळ आम्हाला कधी बसलीच नाही.लोकमान्य तुमचा गणिताचा आणि खगोलशास्त्र यांचा प्रदीर्घ आणि गाढा अभ्यास पाहून राजकारणीही उच्च शिक्षित असू शकतात हे कळालं.
                  गेली ६० वर्षे आमच्या अभ्यासक्रमात तुमच्या शेंगांचीच गोष्ट आहे.त्यापुढचा तुमचा रक्त उसळवणारा इतिहास आम्हाला फारसा  शिकवलाच जात नाही.
                  टिळक आजकाल तुमच्या जहाल पण योग्य तत्ववादी  मतही मावाळ करण्याचा प्रयत्न चालू आहे.आम्हाला पराकोटीची सहनशीलता शिकून अहिंसेचे दिंडोरे पिटले जातात आणि महापराक्रमी हिंदुस्तानाला षंढ करण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळेच अन्याय झाला तरी सर्व गप्पच,कारण अहिंसेमुळे आमचे रक्त उसळतच नाही,राग येतच नाही.
                    लोकमान्य तुमची सडेतोड लिहिण्याची शैली तर आजकाल खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते.नाहीतर बहुतांश लोक हे आपल्याला ज्याच्यापासून फायदा होते त्याचेच गुणगान गातात,अगदी ते चुकीचे,मिथ्या असले तरी आणि तरीही एखाद्याने सडेतोड लिहिलेच तर त्याला जाळून मारण्याचेही प्रकार हल्ली घडतात.
                  तुम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमची तत्व बदलली नाहीत.पण,आजकाल तत्व ही सांगता येत नाही कधी हवामानासारखी सतत आणि लगेच बदलतील.आजकाल कुणीच तुमच्यासारख देशसेवेसाठी,समाजसेवेसाठी आपल्या चैनीवर कुऱ्हाड घालायला तयार नसतो.आजकाल निवडणुकीवेळी आम्ही जनतेचे सेवक आहोत असं म्हणणाऱ्या राजकारण्यांच्या हजारो कोटींच्या संपत्त्या आढळतात.अगदी त्या अवैध,बिनहिशोबी असल्यातरीही त्याचा उपभोग घेतलाच जातो.
                 असे असले तरी काय सगळेच वाईट नाहीत.देशासाठी,समाजासाठी झटणारे,आपले आयुष्य अर्पण करणारे लोक आहेतच.तसं,नसत तर आपला समाज कधीच उध्वस्त झाला असता.शेवटी अशावादी आणि क्रियाशील राहिलेच पाहिजे.कारण,अशा आणि क्रिया ही तर माणसच्या जीवनाचा आधार आहेत.
                पण,लोकमान्य तुम्ही आमच्यावर खूप विश्वास टाकलात.पण,निदान अजून तरी आम्ही तो विश्वास सार्थ करू शकलो नाही.पण,विश्वास ठेवा टिळक तुमचा विश्वास आम्ही खोटा नाही ठरू देणार.आम्ही नक्कीच तुमचा विश्वास सार्थ ठरवू आणि कोणत्याही गोष्टीवरचा जन्मसिद्ध हक्क सांगण्यापूर्वी तो मिळवण्यासाठी तुमच्यासारखेच कष्ट घेण्याची तयारी ठेवीन.
शेवटी मी माझ सर्वस्व अर्पण करून तुमच्या चरणी लीन होतो.
           

        धन्यवाद

      





             अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी
             
             १२ वी (विज्ञान)

             खारघर,नवी मुंबई.
     






  















Comments

  1. उत्तम अपुर्व, असेच लिहित जा. सुंदर विचार. आजच्या जनतेने विचार करायला हवा. आपण आपले प्रतिनिधी म्हणुन कोणाला निवडुन देत आहोत. आजच्या नवीन पिढीने विचार करायला हवा, पैसे कमावणे की देशाचे हित साधणे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर : एक विचारधारा - भाग १

चापेकर बंधूंची अजरामर कहाणी - गोष्ट भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या राजकीय हत्येची

सावरकर एक विचारधारा : भाग २