Posts

तेजोमय स्वतंत्रवीर सावरकर (Tejomay Swatantryveer Savarkar)

Image
                प्रखर तेज, वाऱ्याशी स्पर्धा करणारा बुद्धीचा वेग, खडकासारखी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीनही शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता, ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करायची ते थोर पुरुष म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.                                    Play In Audio   या थोर देशभक्ताने आयुष्भर फक्त देशसेवाच केली. स्वताच घर अथवा संसार असा कधी केलाच नाही. आपल्या जीवन हयातीत बारा हजार (१२,०००) पानांचं साहित्य लिहून ठेवलं. इंग्रजीतील प्रत्येक शब्दाला मराठीत पर्यायी शब्द शोधला आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे वैभव वाढवले आणि भाषा समृद्ध केली.           स्वातंत्र्यवीर सावरकर देशकार्यासाठी इंग्लंडमध्ये शिकत असताना, पुस्तकातून आपल्या क्रांतिवीरांना शस्त्र पाठवली. देशप्रेमासाठी भर समुद्रात उडी मारून सतत चार दिवस पोहत राहिले आणि पोहतान...

‘ईश्वर नाकारण्याचा अट्टाहास का?’

Image
                           Play In Audio                    अलीकडील एक लेखक हे ईश्वराच्या अस्तित्वा विषयी भूमिका मांडत आहेत. त्यांचे लेख वाचल्यानंतर अश्या प्रकारच्या नकारत्मक लिखाणाचा प्रतिवाद करावा वाटला म्हणून हा लेखन प्रपंच केला. सदर लेखामधून लेखक यांनी ईश्वर अथवा त्यचे अस्तित्व नाकारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. परंतु ईश्वर आहे कि नाही? ईश्वराच्या अस्तित्वाची सत्यता काय? हे प्रश्न अगदीच निरर्थक वाटतात. कारण,ईश्वर हा सिद्धांत मांडण्याचा नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. ‘निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा’ या लेखात लेखक महाशय स्वतः म्हणतात की, ‘ईश्वर नाही हे गणितासारखे सिद्ध करता येत नाही’ म्हणजेच त्याला अनुभवून सिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विज्ञान ही अनुभवाला महत्व देतेच .कारण,नुसताच सिद्धांत मांडून उपयोग नसतो तर त्याचा अनुभवही यायला लागतो. न्यूटनने मांडलेला सिद्धांत लोक अनुभवत होते, म्हणूनच तो सर्व मान्य झाला. तसेच,ल...

'माफ करा टिळक...'

Image
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस"

                   आज आपण २१व्या शतकात भौतिक सुविधांच्या दृष्टीकोनातून प्रगतीच्या शिखरावर वाटचाल करीत आहोत.पण,माणूसपणाच्या दृशिकोनातून मात्र आपला प्रवास उलटया दिशेने चालू आहे.                    खरच....माणूस म्हणजे कोण?असे म्हटले जाते की,परमेश्वराने सर्व प्राणी,पक्षी व इतर जीव निर्माण करून झाल्यानंतर त्याला आपल्यासारखेच काहीतरी निर्माण करावेसे वाटले व त्यातूनच त्याने माणसाची निर्मिती केली.पहा ना,इतर  प्राण्यांमध्ये आणि आपणात केवढा फरक आहे.म्हणूनच माणूस म्हणजे परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती.परंतु,आज माणसाने आपल्या कृतीतून प्रत्यक्ष निर्माण कर्त्यालाही लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे आणि त्यातूनच हा विषय निर्माण झाला ‘अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’                     फार फार वर्षापूर्वी माणूस हा जंगलातून इतर प्राणांसारखाच राह...

'मृत्युंजय'

Image
नाव-मृत्युंजय लेखक-शिवाजी सावंत पृष्ठ-७२८ विषय-कर्णाचे जीवन                                                        शिवाजी सावंत लिखित 'मृत्युंजय ' या कादंबरीला अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त आहेत. या कादंबरीत महारथी,दानवीर,सूर्यपुत्र 'कर्ण' याची उत्तम,जगाला आदर्श अशी कथा वर्णन केली आहे.महाभारतामध्ये कर्ण हा दुर्योधनाच्या बाजूने राहिल्यामुळे अनेकांनी त्याला वाईटच ठरविला.पण,'शिवाजी सावंत' यांनी कर्ण हा खरा कोण होता.त्याची सत्यता 'मृत्युंजय' या कादंबरीत आपल्या उत्कृष्ठ लेखनशैलीतून जगासमोर ठेवली आहे.                             या कादंबरीमध्ये 'शिवाजी सावंत' यांनी प्रत्येक गोष्टीचे अगदी बारकाईने व उत्तम शब्दालंकारात वर्णन केले आहे.यात त्यांनी निसर्ग सौंदर्याचे अत्त्यंत सुंदर वर्णन केले आहे.'मृत्युंजय' हे पुस्तक वाचताना त्यातील प्रत्येक प्रसंग...