अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस"
आज आपण २१व्या शतकात भौतिक सुविधांच्या दृष्टीकोनातून प्रगतीच्या शिखरावर वाटचाल करीत आहोत.पण,माणूसपणाच्या दृशिकोनातून मात्र आपला प्रवास उलटया दिशेने चालू आहे. खरच....माणूस म्हणजे कोण?असे म्हटले जाते की,परमेश्वराने सर्व प्राणी,पक्षी व इतर जीव निर्माण करून झाल्यानंतर त्याला आपल्यासारखेच काहीतरी निर्माण करावेसे वाटले व त्यातूनच त्याने माणसाची निर्मिती केली.पहा ना,इतर प्राण्यांमध्ये आणि आपणात केवढा फरक आहे.म्हणूनच माणूस म्हणजे परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती.परंतु,आज माणसाने आपल्या कृतीतून प्रत्यक्ष निर्माण कर्त्यालाही लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे आणि त्यातूनच हा विषय निर्माण झाला ‘अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’ फार फार वर्षापूर्वी माणूस हा जंगलातून इतर प्राणांसारखाच राहत होता.परंतु,परमेश्वराने दिलेल्या बुद्धीच्या वरदानातून व स्वकष्टातून त्याने हळूहळू प्रगतीला सुरवात केली व स्वतंत्र राहण्यापेक्षा एकीने राहणे,मिळून राहणे जास्त फायद्याचे आहे हे त्याला समजल्याने तो समूहाने राहू लागला व समाजाची निर्मिती झाली.